*डॉ.अभिजित व डॉ. मनीषा सोनवणे दाम्पत्याला Zee टीव्ही नॅशनल अवॉर्ड*
*@doctorforbeggars भिक्षेकरी यांच्यासाठी करत असलेल्या कामाची दखल घेऊन सामाजिक क्षेत्र या कॅटेगरीमध्ये पुरस्कार*
झी टिव्ही या नॅशनल चॅनेल समूहाने “डॉक्टर फॉर बेगर्स” म्हणून भिक्षेकऱ्यांसाठी करत असलेल्या कामासाठी डॉ.मनिषा व डॉ.अभिजित सोनवणे दाम्पत्याला सामाजिक क्षेत्र कॅटेगरी मधील “झी टिव्ही नॅशनल अवॉर्ड” जाहीर केला आहे. या कार्यक्रमाचे देशभरातून “झी युवा वाहिनी” या चॅनलवर ३१ तारखेला संध्याकाळी ७.०० वाजल्यापासून प्रक्षेपण होणार आहे.
झी टिव्ही नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर डॉ.अभिजित यांनी “झी टीव्ही या नॅशनल चॅनल समूहाने भिक्षेकरी यांच्यासाठी करत असलेल्या “आपल्या” कामाची दखल घेऊन “आपणा” सर्वांना सामाजिक क्षेत्र या कॅटेगरीमध्ये एक पुरस्कार दिला आहे.
आपल्या सर्वांच्या वतीने मी आणि मनीषा हा पुरस्कार स्वीकारत आहोत” अशी अत्यंत नम्र प्रतिक्रिया देऊन हा पुरस्कार आपला नसून ज्यांनी अदृश्य स्वरूपात आपल्या कार्यात हातभार लावला आहे त्या आपणा सर्व सहकारी, मदतगारांचा आहे असे सांगितले. डॉ.अभिजित कधीच मिळालेल्या पुरस्काराची जास्त वाच्यता करत नाही कारण, हे पुरस्कार त्या त्या गावात असतात. तिथे सर्वजण जाऊन पाहू शकत नाहीत की त्याचं थेट प्रक्षेपण नसतं. मात्र हा झी टीव्ही, नॅशनल टीव्ही असल्यामुळे संपूर्ण भारतभर या कार्यक्रमाचे प्रदर्शन होईल आणि सर्वांना घरबसल्या हा कार्यक्रम पाहता येणार आहे.
आपल्याला मिळालेल्या पुरस्कारावर भाष्य करताना ते पुढे म्हणतात की, “कठपुतली नाचत असते परंतु, तिला दिग्दर्शन करणारे हात अदृश्य असतात. इतकंच काय, हात आणि कठपुतली यांना जोडणारी दोरी सुद्धा अत्यंत पातळ असते, परंतु ती फार मजबूत असते. कटपुतली कौतुकास पात्र होते, हात अदृश्य राहतात. दोरीचा तर कोणी विचार सुद्धा करत नाही…. ! याच कटपुतली च्या भूमिकेत मी आणि मनीषा आहोत. दिग्दर्शक म्हणून असणारे अदृश्य हात आपले आहेत व मधली न दिसणारी दोरी म्हणजे तुमचं आणि माझं नातं आहे…! हे नातं असंच राहो” अशी त्यांनी मनापासून प्रार्थना देखील केली आहे.
डॉ.सोनवणे दाम्पत्य समाजासाठी अहोरात्र झटत असताना आपला पुरस्कार सुद्धा इतरांना अर्पण करणे म्हणजे निस्वार्थ सेवेची पोचपावती.
डॉ अभिजित यांनी सावंतवाडीतील मिलाग्रिस हायस्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण घेतले होते. त्यानंतर सातारा, पुणे येथे पुढील शिक्षण घेऊन ते पुण्यात डॉक्टरी व्यवसाय करतात. डॉ.सोनवणे दाम्पत्य आपल्या व्यवसायातील अमूल्य वेळ भिक्षेकरी समाजातील व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्यावर शारीरिक, मानसिक, आरोग्य विषयक उपचार करण्यासाठी व्यतीत करतात. भिक्षेकरी व्यक्तींना भिक्षा मागणे सोडून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास ते स्वखर्चाने मदत करतात. सोहम ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचा भिक्षुकी ते व्यावसायिक, नोकरदार असा प्रवास घडविला आहे. दीनदुबळ्या, रस्त्यावर अनाथ पडलेल्या गोरगरिबांना औषधी इलाज, वेळ प्रसंगी मोठी ऑपरेशन सुद्धा करून त्यांनी जीवनदान दिलेले आहे. अनेकांसाठी आरोग्य शिबिरे घेतली आहेत. कित्येक आयांचे ते मुलगे झालेत तर कुणा अनाथांचे बाप बनले आहेत. त्यांच्या या अतुलनीय सामाजिक कामाची दखल घेऊन झी टिव्ही ने त्यांना “झी टिव्ही नॅशनल अवॉर्ड दिला आहे. डॉ.सोनवणे दाम्पत्याला मिळालेल्या पुरस्कारामुळे समाजातील विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले आहे. डॉ.अभिजित यांच्याशी संपर्क साधण्यासाठी क्रमांक. 9822267357
संवाद मीडिया*
*📣प्रवेश सुरु….📣प्रवेश सुरु….📣 प्रवेश सुरु….📣*🏃🏃♀️
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे….*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
*एस.एन.डी. टी. महिला विद्यालय, मुंबई संलग्न*
*BCA*
*प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*
*बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स*👩🎓🧑🎓
*2024-25 ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी, कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो*
*अधिक माहितीसाठी…👇*
*📲7972997567*
*📲9420274119*
*या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/130318/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*