*कवी गझलकार विजय वडवेराव यांचे आयोजन*
पुणे :
भिडे वाडा बोलला, या कवी, गझलकार विजय वडवेराव आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भिडे वाडा बोलला या विषयावर ६०० च्या वरून कविता प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये कवयित्री लेखिका पल्लवी उमरे नागपूर (मुंबई) यांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे. मुलींची सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात सुरू केलेली पहिली शाळा, तिचा एकंदर प्रवास कथा आणि व्यथा पल्लवी उमरेंनी आपल्या रचनेतून मांडला आहे. प्रथम पुरस्कार कविता मुरुमकर ( सोलापूर)दुसरा पुरस्कार अनुराधा शेडगे (सांगली) तर तिसरा पुरस्कार माया मुळे धाराशिव यांनी पटकावला.
उद्या दिनांक ३१ मार्च रोजी मराठी साहित्य परिषद टिळक रोड डेक्कन पुणे येथे पारितोषिक सोहळा संपन्न होत आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डाॅ, संदीप सांगळे लोकमतचे जेष्ठ पत्रकार श्री संजय आवटे उपस्थित असणार आहेत. तर अध्यक्षस्थानी स्वतः विजय वडवेराव असणार आहे.
याआधी समाजरत्न, साहित्यरत्न असे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार पल्लवी उमरे यांच्या नावावर आहेत. या ऐतिहासिक स्पर्धेत यश संपादन केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.