*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि.ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*काव्यांजली*
************
कविता गझल प्रतिबिंब भावनांचे
अलवार काळजातील ती शब्दुली
शब्दस्वरी , गंधाळ आत्मचिंतनाचा
दैवजात मुक्त ओसंडणारी शब्दुली
कल्लोळ भावोत्कट , छंद राजसी
सरस्वतीची आराधना ती आगळी
शब्दभावनांचे नाते मनस्वी लाघवी
जणु शब्दफुलांची पुजाच बांधलेली
कविता , गझल , हझल स्वयंभुत्वी
प्रसवणारी , जिंदादिल काव्यांजली
आपण फक्त लिहीत , लिहीत रहावे
वास्तवास व्यक्त करावे सदा प्रांजली
*****************************
*रचना क्र. ५६ / २८ /३ /२०२४*
*#©️वि. ग.सातपुते.(भावकवी )*
*📞( 9766544908 )