You are currently viewing श्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन विजय ग्रंथ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

 

*श्री गजानन विजय ग्रंथ* 

अध्याय नववा

 

अश्व गोविंद बुवांचा

खोडकर अती द्वाड

भयभीत सदा बुवा

डोई चिंतेचे जोखड ||

 

साखळदंडाने घोडा

बांधितसे नित्य नेमे

विसरले साखळी हो

आले मंदिरात प्रेमे ||

 

च-हाटाने कसातरी

घोडा बांधून ठेवला

शांत घोडा पहाताच

आश्चर्यचकीत झाला ||

 

गण गण गणात हा

नवाक्षरी मंत्र छान

मिळे नवव्या अध्यायी

हित साधते महान ||

 

मंत्ररूप साखळीने

घोडा बांधून ठेवला

जडजीव उद्धारण्या

अवतार हा घेतला ||

 

अश्व केला असा शांत

आकळले पशुपक्षी

खल प्रवृतीचा नाश

कृपेनेच होतो अक्षी ||

 

बाळकृष्ण रामदासी

पत्नी पुतळा ही त्याची

उभयता पायीवारी

करी सज्जनगडाची ||

 

खूप वर्षे नियम हा

दोघांनीही केला असे

देह थकला हो त्यांचा

वाटे वारी न होतसे ||

 

बाळकृष्णा स्वप्नी आले

करी उत्सव हा घरी

तुझ्या सदनी येईन

रामदास कृपा करी ||

 

बाळकृष्णा घरी आले

गजानन उत्सवाला

समर्थांचे रूप दावी

बाळकृष्ण श्री भक्ताला ||

 

संभ्रमात बाळकृष्ण

बोध भक्ता असे केला

श्लोक वांसासी जीर्णांनी

आठवण दिली त्याला ||

 

बोधामृत सर्वांसाठी

ध्यानी ठेवा शिकवण

संशयात्मा विनश्यती

सदा ठेवा आठवण ||

 

©️®️

सौ.मंजिरी अनसिंगकर

नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा