नेहरू युवा केंद्रातर्फे राष्ट्रीय युवा संसद फेस्टिवल 2021 चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

नेहरू युवा केंद्रातर्फे राष्ट्रीय संसद फेस्टिवल 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर फेस्टिवल ही जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणार आहे. जिल्हा स्तरावरील युवा संसद दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन घेण्यात येणार आहे. ही संसद मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये होणार आहे. तर राज्या युवा संसद 1 ते 5 जानेवारी 2021 या कालावधी ऑनलाईन होणारी ही युवा संसद मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये होईल. तर राष्ट्रीय युवा संसदही दिनांक 12 आणि 13 जानेवारी 2021 रोजी संसद भवन नवी दिल्ली येथे होणार आहे. राष्ट्रीय युवा संसद ही हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये होईल.

            जिल्हास्तरीयय भाषणाचे विषय पुढील प्रमाणे आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 भारतातील शिक्षणाचे परिवर्तन करेल, नवीन सामान्य स्थितीत ग्रामिण अर्थव्यवस्था अनलॉक करणे, झिरो बजेट नॅचरल फार्मिंग हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. उन्नत भारत अभियान- अनलिजिंग द पॉवर ऑफ कम्युनिटीज ॲन्ड युजिंग टेक्नॉलॉजिज फॉर देअर अपजिफ्टमेंट.

            या युवा संसदेसाठीचे नियम पुढील प्रमाणे आहेत. वय 18 ते 25 दरम्यान असावे, भाषणाची वेळ 4 मिनीटांची असेल, जिल्हास्तरीय पहिला व दुसरा विजेता राज्यस्तरावरील युवा संसदमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असेल, राज्य स्तरावरील पहिला, दुसरा आणि तिसरा विजेता दिल्ली संसद भवनामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसदसाठी पात्र होईल. राष्ट्रीय स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय परितोषिक अनुक्रमे 2 लोख, दीड लाख आणि एक लाख रुपये असे आहे. राष्ट्रीय स्तरावर सहभागी व्यक्तींना विमानाद्वारे दिल्लीला पाठवले जाईल.

            युवा संसदमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी रजिस्ट्रेशन फॉर्म, जिल्ह्याचा रहिवासी दाखला असणारे सहकारी ओळखपत्र उदा. अधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, जन्मतारीख प्रमाणपत्र, पासपोर्ड साईज फोटो, जिल्हा युवा अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडून ट्रु कॉपी केलेला रजिस्ट्रेशन फॉर्म ही कागदपत्रे दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजीपर्यंत नेहरु युवा  केंद्र, सिंधुदुर्ग येथे सादर करावीत. अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग येथे दूरध्वनी क्रमांक 7666439548, 9421267011, तसेच ई-मेल आडी –  qnysindhudurg@gmail.com येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक, नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा