*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रंग बरसात*
आनंदाने खिदळत
झाली रंग बरसात
सृष्टी घडवी दर्शन
पहा हसत गालात
पीतपर्णी पायी चाळ
तरु वाजवी तालात
वारा स्पर्शता गंधाळ
शेंडे नाचती डौलात
ताम्र मुकुट कलला
सावरील त्या क्षणात
नवा फुलोरा नटला
गौर,केतकी रंगात
लाल पिवळे सोनेरी
सडे नील गगनात
गुप्त इंद्र पिचकारी
बहु निपुण कौशल्यात
काळ्या, हिरव्या,पारव्या
पक्षी विविध वेशात
गानवृंदा समवेत
पिक रमे गायनात
विजया केळकर__________
नागपूर