You are currently viewing आकेरीत पावणे चार लाखांच्या दारुसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

आकेरीत पावणे चार लाखांच्या दारुसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

आकेरीत पावणे चार लाखांच्या दारुसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

एक्साईजच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई

बांदा

गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात एक्साईजच्या कोल्हापूर भरारी पथकाने कुडाळ तालुक्यातील आकेरी येथे कारवाई केली. या कारवाईत ३ लाख ७४ हजार ८८० रुपयांच्या दारूसह ५ लाख ४० हजार रुपयांची स्विफ्ट कार असा एकूण ९ लाख १४ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी प्रकाश कुंजन नायर (४२, रा.तावडेवाडी, आकेरी) याला ताब्यात घेण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. कोल्हापूर एक्साईज भरारी पथक सावंतवाडी – आकेरी येथे सापळा रचून होते. सावंतवाडीहून गोव्याच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार (एमएच ०६ एएन १७०३) तपासणीसाठी थांबवण्यात आली. कारची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या दारूचे ६२ बॉक्स आढळून आले.

सदरची कारवाई दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, वाय. एन. फटांगरे, जवान सुशांत बनसोडे, विलास पवार, योगेश शेलार यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक वाय. एन. फटांगरे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा