You are currently viewing १० एप्रिल पासून आडवली समर्थ गड येथे स्वामी समर्थ जयंती उत्सव

१० एप्रिल पासून आडवली समर्थ गड येथे स्वामी समर्थ जयंती उत्सव

मसुरे :

 

मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थगड-आडवली येथे १० एप्रिल २०२४ रोजी श्री स्वामी जयंती उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त १० एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

१० एप्रिल रोजी सकाळी ६ ते ९ विधीवत पूजा, सकाळी ९.०० वा. नंतर भाविक भक्तांना दर्शन, दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी २ ते सायं. ७.३० पर्यंत हळदीकुंकू समारंभ, रात्री ८.०० ते ८.३०. महाआरती, ९.०० ते १२.०० महाप्रसाद ९.०० वा. पासून सुस्वर स्थानिक भजने. ११ आणि १२ एप्रिल रोजी रात्री ९.०० वा. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील स्पर्धकांची एकेरी नृत्य स्पर्धा.

प्रथम पारितोषिक रु. ९०००/- सन्मानचिन्ह,

द्वितीय पारितोषिक रु.७०००/- सन्मानचिन्ह,

तृतीय पारितोषिक रु.५०००/- सन्मानचिन्ह,

उत्तेजनार्थ बक्षीस. सर्व स्पर्धकांनी वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. रात्री ९.०० वा. अल्पोपहार खिचडी, शिरा, चहा. १३ आणि १४ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील स्पर्धकांची

समूह नृत्य स्पर्धा…

प्रथम पारितोषिक रु. १५,०००/- सन्मानचिन्ह,

द्वितीय पारितोषिक रु.१२,०००/- सन्मानचिन्ह,

तृतीय पारितोषिक रु.९,०००/- सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ बक्षीस.

रात्री ९.०० वा. अल्पोपहार खिचडी, शिरा, चहा. १५ एप्रिल रोजी रात्री ९ वा. भजन अलंकार बुवा अजित गोसावी, बुवा भालचंद्र केळुसकर, बुवा कृष्णा राऊळ यांचा संगीत जुगलबंदी कार्यक्रम.

१६ एप्रिल रोजी रात्री ९ वा. २०-२० तिरंगी भजनबारी सामना, बुवा विनोद चव्हाण, बुवा संदीप पुजारे, बुवा अरुण घाडी या भजनी बुवांमध्ये होणार आहे. या सामन्यात प्रेक्षकांना मधून प्रश्नोत्तरे करण्यात येणार आहेत. परिक्षण बुवा भालचंद्र केळुसकर करणार आहेत.

१७ एप्रिल रोजी रात्री ९ वा. एकेरी नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धेतील प्रथम पाच स्पर्धकांचा महा मुकाबला स्पर्धा होणार आहे. स्पर्धेनंतर लगेच बक्षीस समारंभ होणार आहे.

१८ एप्रिल रोजी सांगता सोहळा सकाळी विधिवत पूजा, रात्री ८ ते ८.३० महा आरती, रात्री ९ वा. महाप्रसाद, रात्री ९.०० वा. सेवेकरी पालकांच्या मुलांचे व दशक्रोशीतील मुलांसाठी एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहे. यावेळी भव्य दिव्य जत्रोत्सव आकाश पाळणी, खेळणी, कपडयांची दुकाने इत्यादी असणार आहेत. अधिक महिती साठी डॉ. सिद्धेश सकपाळ (९४२०८९०८१०), प्रकाश गवस (९४०३३५०८४९), सिताराम नागेश सकपाळ (९४२०२१०२६२), अतुल घाडीगांवकर (९५७९०५८९०३), समीर घाडी (९३५९५०८१२१), गणेश घाडी (९२८४६२०५३२), आकाश तावडे (९३५६७४६३६४) येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ चरणसेवक भाई महाराज यांनी केले आहे. सर्व कार्यक्रमांना उपस्थीतीचे आवाहन समर्थ गड आडवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा