कणकवलीसह जिल्ह्यात बीएसएनएलचे नेटवर्क नॉट-रिचेबल
बीएसएनएल नेटवर्क तातडीने सुस्थितीत करा; सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर, संजय मालंडकर यांनी केली निवेदनातून मागणी
कणकवली
आम्ही कणकवली शहारातील सामाजिक कार्यकर्ते आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, कणकवली शहरात नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल भारतीय दूर संचार निगमच्या रेंज मध्ये वारंवार बिघाड होत आहे. गेले कित्येक महिने सर्वसामान्य नागरिक बीएसएनएलचे नेटवर्क ये-जा करत असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस बीएसएनएल नेटवर्क नॉट रिचेबल होत चाललं आहे.
अजूनही ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिक असो वा शहरातील नागरिक, प्रत्येक नागरिकांवर बीएसएनएल कंपनीवर विश्वास असल्याने मोठ्या संख्येने जिल्ह्यात बीएसएनएल कंपनीला पसंती देत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलमडलेली बीएसएनएल सेवा सुस्थितीत करुन कणकवली शहारासह, ग्रामीण भागामधील बीएसएनएलची सेवा तातडीने सुस्थितीत करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर राजेंद्र पेडणेकर ,संजय मालंडकर, सी आर चव्हाण, अविनाश गावडे आधी सामाजिक कार्यकर्त्यांनी कणकवली येथील बीएसएनएलच्या कार्यालयातील अभियंत्यांना भेट देऊन तातडीने बीएसएनएल सेवा सुस्थितीत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.