You are currently viewing कणकवली नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन…

कणकवली नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन…

कणकवली नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन…

कणकवली

नगरपंचायतच्या ५२ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्यातील वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक हाल होत आहेत. या विरोधात नगरपंचायतचे सर्व कंत्राटी कर्मचारी एकवटले असून त्यांनी आज सकाळपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
कणकवली नगरपंचायत मध्ये एकूण ५२ कंत्राटी कर्मचारी आहेत. याच्यामध्ये कणकवली शहरांमध्ये सफाई कामगार आणि ट्रॅक्टर तसेच अन्य वाहनांवरील चालकांचा समावेश आहे. नगरपंचायतच्या वतीने ठेकेदाराकडून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन दिले जाते. मात्र फेब्रुवारी महिन्यातील वेतन आता मार्च महिना संपत आला तरीसुद्धा देण्यात आलेले नाही. वारंवार मागणी करूनही ठेकेदार न कर्मचाऱ्यांच्या वेतन देणारी दुर्लक्ष केला आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा पीएफचे पैसे वजा करून घेतले जातात मात्र याचवेळी तेवढीच रक्कम ठेकेदारांना सुद्धा पीएफ मध्ये जमा करणे बंधनकारक असूनही ठेकेदार आपल्याकडील पीएफची रक्कम मात्र जमा करत नाही आहे आणि या विरोधात सुद्धा हे काम बंद आंदोलन आहे जोपर्यंत आपला फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळत नाही आणि ठेकेदार त्याच्याकडील पीएफची रक्कम जमा करत नाही तोपर्यंत काम बंधन आंदोलनावरती ठाम असण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा