You are currently viewing श्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन विजय ग्रंथ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

 

*(श्री गजानन विजय ग्रंथ)*

अध्याय सातवा

 

महाराज वर्णितात

योगशक्ती महिमान

कथा सातव्या अध्यायी

दंतकथा नाही जाण ||

 

हरि पाटील शेगांवी

मदमत्त सत्ताधारी

हेटाळणी करतसे

समर्थांची हा मंदिरी ||

 

कुस्ती खेळण्या आव्हान

हरि पाटलाने दिले

खाली बैसले समर्थ

उठवाया सांगितले ||

 

उठविण्या समर्थांना

केली हरिने शिकस्त

प्रयत्नांची पराकाष्ठा

असफल कसरत ||

 

हरि बंधु धांव घेती

समर्थांना देण्या मार

अट श्रीं पुढे ठेवली

वळ नको अंगावर ||

 

जैशा ओंब्या झोडतात

केले ऊसाचे प्रहार

वळ न उठले देही

झाला मोठा चमत्कार ||

 

ऊस पिळला हाताने

रस नव्हाळी मुलांना

योगशक्ती टिके सदा

तत्व सांगे हे लोकांना ||

 

योग शिकावा सर्वांनी

राष्ट्र होण्या बलवान

दृष्टी न वाकडी होई

सर्व करिती सन्मान ||

 

पुरातन असे शास्त्र

करा योग अंगिकार

स्वस्थ रहावे सर्वांनी

अध्यायाचे हेच सार ||

 

©️सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा