कणकवली
लोकसभा निवडणुकीतील बहुजन रिपब्लिकन पार्टी चे उमेदवार म्हणून निवडणूक लढलेले राजेश जाधव यांनी आज भाजपा पक्षात प्रवेश केला.त्याच बरोबत तळेरे ग्रामपंचायतच्या शिवसेनेच्या एकमेव सदस्या असलेल्या सौ.रिया भोगले आणि तळेरे युवा सेना प्रमुख रवी भोगले यांनीही भाजपात प्रवेश केला.त्यामुळे तरेळे ग्रामपंचायत पूर्णतः भाजपा मय झाली आहे.या सर्वांचे आमदार नितेश राणे यांनी या सर्वाचे पक्षात स्वागत केले.ओम गणेश निवास्थानी हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
शिवसेना सदस्यसौ.रिया भोगले यांच्या भाजपा प्रवेशामुळे तळेरे ग्रामपंचायतीत आता १०० % ग्रा.पं. सदस्य भाजपाचे झाले आहेत.शिवसेनेचा एक सदस्य तोही भाजपात गेला असल्याने तळेरे भागात सेनेला फार मोठा धक्का बसला आहे.या प्रवेशवेळी जि. प. बांधकाम सभापती बाळा जठार, पं.स. सभापती दिलीप तळेकर, माजी जि.प.महिला बालकल्याण सभापती रत्नप्रभा वळंजू, तळेरे सरपंच साक्षी सुर्वे,भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पं.स.सदस्य मनोज रावराणे, खारेपाटण शक्तिकेंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर,अण्णा कोदे आदी होते उपस्थित होते.
जनतेचे प्रश्न सुटावेत म्हणून आम.राणे यांच्या नेतूत्वाखाली भाजपात-राजेश जाधव,आमदार नितेश राणे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देतात. माझ्या मनातील जनतेचे प्रश्न आम.नितेश राणे खुबीने सोडवलीत. सर्वसामान्य जनतेच्या मनात आपला हक्काचा आमदार म्हणून नितेश राणे यांनची प्रतिमा निर्माण केली आहे.त्यामुळे लोकांचे प्रश्न सुटावेत याचसाठी मी आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपा त प्रवेश करत असल्याचे बहुजन रिपब्लिकन पार्टीचे २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविलेले उमेदवार राजेश जाधव यांनी सांगितले.