You are currently viewing होळी

होळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*होळी*

 

सण आला आनंदाचा

नेसते पैठणी चोळी

हेवा दावा विसरु या

चैतन्याची आज होळी

 

आला आला होळी सण

आनंदाची भरु झोळी

जुन्या चाली रीती जोडू

बांधू संस्काराची मोळी

 

नको कलह नि तंटा

नको राग द्वेष मोठा

होळी सण आज आला

नाही आनंदाला तोटा

 

अहंकार तो पेटवू

अत्याचाराला आडवु

भ्रष्टाचाराचा आसुर

अग्नी ज्वाळेत पाठवु

 

पर्यावरण राखु या

वृक्षवल्ली नका तोडु

रंग निसर्गाचा घेवु

नाते तया संगे जोडू

 

तोरण संस्काराचे बांधू

चैतन्याचा दिन आज

सजलेल्या निसर्गाचा

पाहु नटलेला साज

 

*शीला पाटील. चांदवड*

प्रतिक्रिया व्यक्त करा