*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समुहाच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*
*(श्री गजानन विजय ग्रंथ)*
अध्याय चौथा
दिसे चवथ्या अध्यायी
समर्थांची लीला न्यारी
पेटविली चिलीम हो
विस्तवावाचून खरी–||
वन्ही निश्चित लागतो
पेटविण्या चिलीमीस
सोनाराची बागेसरी
प्रज्वलीत प्रभातीस ||
मुले मागण्या विस्तव
गेली सोनाराच्या घरी
वन्ही देण्यास नकार
नका प्रार्थू परोपरी ||
मुले निराश होऊन
घराकडे परतली
इच्छा विस्तव करण्या
बंकटाने दाखवली ||
समर्थांनी नाकारले
पेटविण्या विस्तवास
काडी धरावी नुसती
नका पेटवू काडीस ||
चिलीमीसी काडी नेता
अग्नि प्रज्वलीत झाला
चमत्कार हा पहाता
हर्ष सर्वांना जाहला ||
सोनाराच्या घरी मात्र
चिंचवणी हो नासले
अळ्या पाहून सगळे
उपोषित ते उठले ||
चूक लक्षांत येताच
जानकी रामाच्या मनी
धांवे बंकट घरासी
माफी मागे”श्रीचरणी” ||
कृपावंत भगवंता
दया करावी समर्था
अपराध तृण जाळी
क्षमा करी तू अनंता ||
चिंचवणी ही मधुर
किडे नसती पडले
“श्रींचे ” बोल ऐकताच
सर्व चकीत जाहले ||
जयजयकार “श्रींचा”
केला भक्तांनी अपार
चमत्काराविण कोण
करीतसे नमस्कार ||
©®सौ.मंजिरी अनसिंगकर
नागपूर.