*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. दक्षा पंडित लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रतिकात्मक होळी सण*
ह्या होळी पौर्णिमेला
षड्ररिपुंचे करू दहन
सदाचाराने वागुनी
करू आत्मचिंतन.१
होलिका महोत्सवात
भ्रष्टाचार,हिंसेचे दमन
सत्तप्रवृत्तींना जवळ करू
होऊया आपण पावन.२
होळीचा सण हा मोठा
नसे आनंदाला तोटा
आळस,नैराश्या घालवू
अनुभवू आनंदाच्या छटा..३
प्रतिकात्मक होळीने
करू पर्यावरण रक्षण
वृक्ष संवर्धन करुनिया
निसर्गाचे करू संरक्षण..४
होळी सणाला लागले
अनिष्ट प्रथांचे गालबोट
नायनाट त्यांचा करण्या
बांधूया प्रयत्नांची मोट …५
डॉ. दक्षा पंडित
दादर,मुंबई