You are currently viewing पाल, शिरंगे, आयनोडे गावातील होळी उत्सवावर बंदी

पाल, शिरंगे, आयनोडे गावातील होळी उत्सवावर बंदी

पाल, शिरंगे, आयनोडे गावातील होळी उत्सवावर बंदी

उसप गावात होळी साजरी होणार; तहसील कार्यालयातील बैठकीत निर्णय

दोडामार्ग

आज पासून सुरू होणाऱ्या होळी सणाच्या पार्श्भूमीवर दोडामार्ग तालुक्यातील पाल, शिरंगे आणि आयनोडे या तिन्ही पुनर्वसित गावांमध्ये शिमगोत्सव साजरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उसप गावातील वादावर तोडगा निघाल्याने तिथे शिमगोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पाल, शिरंगे व आयनोडे या तिनही गावांमध्ये देवस्थानाशी निगडित वाद असल्याने या तिन्ही गावांमध्ये शिमगोत्सव होणार की नाही त्याबाबत साशंकता होती. दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार व पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील तहसील कार्यालयात या चारही गावातील ग्रामस्थांशी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यातील उसप गावातील वाद मिटविण्यात यश आले. उर्वरित गावांतील वादावर तोडगा न निघाल्याने अखेर त्या गावातील शिमगोत्सवावर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, दोडामार्ग शहरासहीत संपूर्ण तालुक्यामध्ये होळी व धुलीवंदनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. होळी सणासाठी मुंबई, पुणे, गोव्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने गावागावात दाखल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.



प्रतिक्रिया व्यक्त करा