You are currently viewing गांगेश्वर मित्रमंडळ व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै.रणजित पाटील प्रिमीयर लिग स्पर्धेचे उद्घाटन

गांगेश्वर मित्रमंडळ व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै.रणजित पाटील प्रिमीयर लिग स्पर्धेचे उद्घाटन

गांगेश्वर मित्रमंडळ व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै.रणजित पाटील प्रिमीयर लिग स्पर्धेचे उद्घाटन

*माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन*

कणकवली

गांगेश्वर मित्रमंडळ व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै. रणजित पाटील प्रिमीयर लिग २०२४ चे उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.आपल्या मित्रावर असलेले प्रेम आणि त्याची आठवण म्हणून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही स्पर्धेचे आयोजन केले. त्याने केलेले योगदान हे समाजासमोर आणले पाहिजे. हा मनामध्ये हेतू बाळगून या स्पर्धेचे आयोजन करतात ही बाब कौतुकास्पद आहे. तरुण पिढी अश्या उपक्रमामुळे घडत गेली आहे असे समीर नलावडे उदघाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी अभय राणे, शिशिर परुळेकर, राजू मानकर, योगेश ताम्हाणेकर, चानी जाधव, विनू महाडिक, सिद्धेश तळगावकर, गौरव मुंज, उमेश नाडकर्णी, दादा पावसकर, सुमित कुवळेकर, सागर राणे, राजा पाटकर, योगेश चव्हाण, योगेश जाधव, रोशन जाधव, अमित जाधव, रोहित जाधव, रोशन जाधव, सचिन राठोड, रुपी मोरे, विनय परब,आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, सुजित जाधव, आनंद भानुशाली, औदुंबर राणे आदींनी कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन उमेश परब , विवेक परब यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा