देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी….
ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या अध्यक्षतेखाली देवगड राष्ट्रवादी कार्यालयात बैठक संपन्न
देवगड
देवगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नेतृत्व करीत असताना देवगडच्या सहकार क्षेत्राबरोबर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात ज्येष्ठ नेते नंदकुमार शेठ घाटे यांचे कार्य उत्तुंग असून वयाच्या ८४ व्या वर्षी देखील त्याच उमेदीने निस्वार्थी व्यक्तीने सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राष्ट्रवादी पक्षाची सेवा करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून प्रारंभीच्या काळापासून शरद पवारांची एकनिष्ठ राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवगड तालुक्यात देवगड तालुक्यात रुजविणे व वाढविणे यात नंदकुमार घाटे यांचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांच्या नेतृत्वावर देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस देवगड तालुका पदाधिकारी जिल्हा कार्यकारी सदस्य निलेश पेडणेकर कार्यकारी सदस्य प्रदीप मुणगेकर यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार व देवगड तालुक्याचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्यकारिणीची विशेष बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय देवगड या ठिकाणी ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून व तत्पूर्वी देखील आदरणीय नेते शरद पवार यांच्या समवेत खंडे समर्थ म्हणून काम करणारे नंदकुमार घाटे यांच्या सहकार क्षेत्रातील तसेच शैक्षणिक क्षेत्रातील व सामाजिक उपक्रमातील भरीव योगदानाबद्दल देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व तालुका तालुक्यातील ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या पाठीशी देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी आहे असा आत्मविश्वास उपस्थित पदाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केला त्या बैठकीला या बैठकीला राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर परब, जिल्हा कार्यकारी सदस्य निलेश पेडणेकर ,माजी सरपंच पुनम मुणगेकर संचालक ललिता शेडगे, नागेश आचरेकर
,तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव,सचिव शरद शिंदे,देवदुर्ग संस्था चेअरमन चंद्रकांत पाळेकर,नागेश आचरेकर नाना मुणगेकर सदस्य गुरुनाथ वाडेकर,शिवराम निकम,शहर अध्यक्ष बंटी कदम,उदय रुमडे कृष्णा परब,ज्ञानदेव भडसाळे, जयराम कदम सुधीर देवगडकर,
शामकांत शेडगे व अन्य उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना नंदकुमार घाटे म्हणाले, आजच्या बदलत्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवगड तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावर व आपल्या पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून आपल्या सहकार क्षेत्रातील तसेच शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपला सन्मान केला त्यामुळे आपण भारावून गेलो आहे.असे सांगत असताना वयाच्या ८४ वर्षी ते भारावून गेले त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते गहिवरले.
सहकार क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणे संस्था काढणे सोपे असते परंतु ती टिकविणे व निस्वार्थीपणे कोणताही ठपका न येता टिकविणे महत्वाचे आहे असे सांगून यात कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सहकार्याने यशस्वी ठरलो असे ही आवर्जून सांगितले.