You are currently viewing फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवा

फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवा

फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवा

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे आवाहन; जिल्ह्यात १ हजार ६०९ तक्रारी प्राप्त

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑनलाइन फसवणूक, हॅकिंग, सोशल मीडिया फ्रॉड अशा वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता गृह मंत्रालयाने https://cybercrime.gov.in हे ऑनलाईन तक्रार पोर्टल तसेच १९३० हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केलेला आहे. या पोर्टलवर जिल्ह्यात आज पर्यंत १ हजार ६०९ तक्रारी प्राप्त झालेल्या असून संबंधित बँक खात्यांमध्ये ७२ लाख रुपये गोठविण्यात आलेले आहेत तर सुमारे २४ लाख रुपये तक्रारदारांना परत करण्यात आलेले आहेत.त्यामुळे फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवा,असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले.

फ्रॉड झाल्यापासून पहिला एक तास हा गोल्डन आवर असतो. ह्या कालावधीत तक्रारदारांनी तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता ( recovery Rate) असते. कोणत्याही प्रकारचा सायबर फॉर्ड घडल्यास नागरिकांनी आपल्या तक्रारी लवकरात लवकर https://cybercrime.gov.in या सायबर पोर्टलवर किंवा १९३० या टोल फ्री नंबरवर नोंदविण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा