कार्यप्रणाली जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री, बंदरमंत्री व पर्यटन मंत्री यांचे अरविंद मोंडकर यांनी मानले आभार
मालवण
मालवण बंदर विभागाकडून वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय बंदी करण्यात आल्यानंतर वॉटरस्पोर्ट्स सुरू करण्याबाबत राष्ट्रीय काँग्रेस मालवणच्यावतीने पंधरा दिवसांपूर्वी राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांची भेट घेतल्यानंतर ना.शेख यानी वॉटरस्पोर्ट्स सुरू करण्याबाबत आदर्श कार्यप्रणाली मंजूर करण्याची ग्वाही दिली होती त्यानुसार ना.शेख यांनी पाठपुरावा करीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी लक्ष वेधले होते वॉटरस्पोर्ट्स व्यवसायासाठी आदर्श कार्यप्रणाली जाहीर करण्यात आली आहे. ही आदर्श कार्यप्रणाली जाहीर करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बंदरे मंत्री अस्लम शेख व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी आभार मानले आहेत . कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात आठ महिने वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय बंद होता. अनलॉक प्रक्रियेत पर्यटन सुरू झाल्यावर जिल्हाधिकारी यांनी वॉटरस्पोर्ट्स सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र काही दिवसांनी बंदर विभागाने वॉटरस्पोर्ट्स बंदीचे आदेश काढत हा व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा व्यावसायिकांना बजावल्या होत्या. व्यवसाय बंद राहिल्याने नुकसान सहन करणारे वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक अडचणीत सापडल्याने या प्रश्नी मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, काँग्रेसचे जिल्हा सचिव बाळू अंधारी यांनी मत्स्य व बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांची वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांसह भेट घेऊन लक्ष वेधले होते. या प्रश्नाबाबत मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कडे पाठपुरावा केला. यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. यानंतर आता राज्य शासनाकडून कोरोनाविषयक खबरदारीच्या दृष्टीने वॉटरस्पोर्ट्स व्यवसायासाठी आदर्श कार्यप्रणाली जाहीर केली असून या कार्यप्रणाली मुळे वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांना व्यवसाय करणे सुलभ होणार आहे. वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांचा प्रश्न सोडविण्यास मंत्री अस्लम शेख यांचे लक्ष वेधल्यावर त्यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्या बद्दल त्यांचे आभार मानत आहोत, असेही अरविंद मोंडकर यांनी सांगितले.