You are currently viewing घालमेल

घालमेल

घालमेल

अशीही वेळ यावी,
दूरवरची तळमळ दिसावी…
मैत्रीतल्या या प्रेमात,
कमी कधीही न व्हावी….

अंतरी आग लागावी,
ओघळल्या अश्रूंनी विजावी…
कोमेजल्या मनासही त्या,
नवी पालवी फुटावी…

घालमेल जीवाची होऊनी,
हृदयीची कंपने वाढवी….
उदरीची भीती बोलण्या,
ओठ शब्दांस अडवी…

(दिपी)
दीपक पटेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा