You are currently viewing साहित्य प्रेरणा कट्टयाचा एकेचाळीसावा मासिक कार्यक्रम रविवारी २३ मार्च रोजी

साहित्य प्रेरणा कट्टयाचा एकेचाळीसावा मासिक कार्यक्रम रविवारी २३ मार्च रोजी

सावंतवाडी :

साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचा मासिक कार्यक्रम रविवार दिनांक २३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० ते ६.०० या वेळेत आजगाव मराठी शाळा येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नाट्यसंहिता या विषयावर साहित्य प्रेरणा कट्ट्याचे सदस्य भाष्य करणार आहेत. साहित्य प्रेरणा कट्ट्याचा हा एकेचाळीसावा कार्यक्रम असून दरवेळी साहित्याशी निगडित विविध विषयांवर वेगवेगळ्या छटा असलेल्या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. त्यामुळे साहित्य रसिक देखील आवडीने कार्यक्रमाचा आनंद लुटतात.

सदर कार्यक्रमात साहित्य कट्ट्याचे सदस्य आपल्याला भावलेल्या विविध नाट्यसंहितेविषयी बोलतील. एखाद्या नाटकाचे लेखन आपल्याला का आवडले? ते व्यावसायिक वा हौशी रंगभूमीवर कसे यशस्वी झाले..? हे सोदाहरण स्पष्ट करतील.

तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण जरूर उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर, आजगाव यांनी केले आहे. कार्यक्रमा विषयी अधिक माहितीसाठी खालील दूरभाष क्रमांकावर संपर्क करावा.

श्री.विनय सौदागर 9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 9 =