You are currently viewing काव्यपुष्प- ७० वे

काव्यपुष्प- ७० वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प- ७० वे*

—————————————–

वामनराव नामे एक साधक । करी चर्चा साधक- बाधक ।

श्री महाराजांना विचारी एक । अर्थ ज्ञानेश्वरी ओवीचा ।।१।।

 

त्या समय महाराज होते रागात । गुंतले होते ते भांडणात ।

चाले भांडण जोरात। वामनराव मुद्दाम विचारी त्याचा प्रश्न।।२।।

 

जेथे काम उपजला । तेथ क्रोध आधीचि आला ।

क्रोधी असे ठेविला । संमोहू जाणे ।। ३ ।।

 

प्रश्न त्याचा महाराजांनी ऐकला । राग त्यांनी शांत ठेवला ।

बोले वामनरावाला । हे सोंग रागाचे उतरू दे। मग बोलतो तुला ।। ४।।

 

भांडण ते मिटले । श्री महाराज भाऊबंदास प्रेमे बोलले ।

प्रसाद देऊनी पाठवले । त्याला ।। ५।।

 

मग, वामनरावा अर्थ सांगितला । म्हणती, विकार ” भगवंताने दिला । विकारांवर सत्ता ठेवणे जो शिकला ।

विकारांची सत्ता त्यावरती ना चाले ।। ६ ।।

—————————————

करी लेखन हे क्रमशः, कवी अरुणदास.

—————————————–

श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प- ७० वे

कवी- अरुणदास- अरुण वि. देशपांडे-पुणे

——————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा