*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
@ *अ शी – अ सा वी* @
नेसून लुगडे नीट नेटके
कुठे नसावे मुळी तोकडे
पदर असावा जागेवरती
मार्गामधले न झाडत तुकडे
पुरेशी आहे यंत्र सामुग्री
पालिका ठेवते आपल्यापाशी
अडखळून पडे कुणी रस्त्यात
नजर खिळते *पदरापाशी*
रसिक जनांचे या नगरात
लक्ष जाते पटकन दिवशी
कुणी देखणी दिसता ललना
नजर खेळते यांची पदराशी
सूती रेशमी वरी काचोळी
पाहता क्षणी शब्द सुचावा
रंग असावा तिचा मनोहर
जसा पारवा मनी असावा
शब्द प्रभूही उभे राहतील
विचार चित्ती सहज येतील
रंभा न उतरली हीच धरेवर
भाव पाहूनी वदती शीतल
नकोत आणीक भाव विभोर
सात्विक तेचा करून उपास
पदन्यास ती टाकत जाईल
पांथस्त करतील उगा उपहास
अशी असावी कविता माझी
*मेनकेसही* प्रश्न पडावे
गाभुळलेले भाव अवलोकिता
*उर्वशीसही* दिवस जावे
विनायक जोशी ✒️ठाणे