*डॉ.शिवचरण उजैनकर फाऊंडेशनचे सन्मा.सदस्य लेखक कवी मनोहर पवार लिखित जागतिक कविता दिनानिमित्त अप्रतिम काव्यरचना*
—————————
*कविता म्हणजे*
अवती भवती माझ्या
रेंगाळत असते कविता !
मनाला घालते पाहून
निसर्ग मनोहर सुंदर
रुंजन करते कविता !
उरातला शब्द कल्होळ
व्होऊन उतरते कागदावर कविता !
शब्दबद्ध लय साधते
माझी प्रेमळ कविता !
ओंजळीत उतरते
कधी गोंजारते कविता !
श्रृंगार करूनि रिझवते
मनास माझ्या कविता !
गझल कधी मझल
चारोळी होते कविता !
छंद घेवून वृत्त पाहून
अलंकारीत सजते कविता !
कधी डोळ्यातून पाणी
गाळते दुखः मांडते कविता !
कधी हृदयास चुंबन
प्रेमरस बरसते कविता !
श्रुंगारते कधी उंडारते
कधी खुलविते संसार कविता !
प्रेमिका कधी सारथी
निर्मळ वाहते कविता !
रडते कधी हसते ती
अलवार वाहाते कविता !
कधी डोळ्यात पाऊस
अलगद खुणावते मज कविता !
–✍🏽————————–
मनोहर पवार
केळवदकर
9850812651.