माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण
सिंधुदुर्गनगरी
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय नुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव क्रीडा गुण देण्यात येत आहे.
मान्यताप्राप्त एकविध खेळांच्या संघटनांद्वारे आयोजित केलेल्या सांघिक, वैयक्तिक खेळांच्या स्पर्धेत विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी होणारे व प्राविण्य संपादन करणारे इ. 10 वी व इ. 12 वीचे खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव क्रीडा गुण अनुज्ञेय आहेत.
वाढीव क्रीडा गुणांचा लाभ जिल्ह्यातील पात्र खेळाडू विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार विविध क्रीडा प्रकारांच्या जिल्हास्तर एकविध संघटनांनी आपल्या संघटनेचा अहवाल व स्पर्धेच्या अधिकृततेबाबतची कागदपत्रांचा अहवाल जिल्हास्तर एकविध संघटनांनी दि. 5 एप्रिल 2024 पूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करावेत.
विहिती मुदतीत अहवाल प्राप्त न झाल्यास संबंधित खेळाडूचे प्रस्ताव परिक्षा विभागीय मंडळाकडे सादर करता येणे शक्य होणार नाही याची नोंद घेऊन आपल्या संघटनांचा अहवाल विहित वेळेपूर्वी कार्यालयास सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी.