You are currently viewing मोर्ले गावात जंगली हत्ती कळपाकडून संतोष मोरये यांच्या केळी सुपारीच्या बागायतीचे नुकसान 

मोर्ले गावात जंगली हत्ती कळपाकडून संतोष मोरये यांच्या केळी सुपारीच्या बागायतीचे नुकसान 

मोर्ले गावात जंगली हत्ती कळपाकडून संतोष मोरये यांच्या केळी सुपारीच्या बागायतीचे नुकसान

दोडामार्ग

गेल्या चार पाच दिवसांपासून मोर्ले गावात जंगली हत्ती कळपाकडून मोठ्या धुमाकूळ सुरू आहे. दिवसाराञी हा कळप लोकवस्ती जवळ असलेल्या नारळ सुपारी केळी, बागायती मध्ये येऊ लागला आहे. त्यामुळे बाहेर पडणे कठीण झाले आहे. यात एक टस्कर हत्ती अंगावर धावून येतो पण वन विभाग कडून बंदोबस्त किंवा कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. बुधवारी रात्री येथील संतोष मोरये यांच्या बागायती मध्ये शिरकाव करून कळपाकडून केळी सुपारी बागायती फडशा पाडून लाखो रुपये नुकसान केले आहे. पण वन विभाग कडून नुकसान भरपाई पुरेशी दिली जात नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
राज्य सरकार वन विभाग यांच्या बेजबाबदार पणामुळे आज या भागातील शेतकरी हत्ती संकटामुळे देशोधडीला लागला आहे. गेल्या २३ वर्षापासून जंगली हत्ती यांचा बंदोबस्त करावा त्यांना त्यांच्या आदिवासात कर्नाटक हद्दीत पाठवावे अशी मागणी केली पण हे सरकार काही करू शकले नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना शेती बागायती करणे कठीण झाले आहे. गेल्या बावीस वर्षात तिलारी खोऱ्यातील अनेक शेतकरी बागायतदार हत्ती संकटामुळे नेस्तनाबूत नाबुत झाले. कवडीमोल भरपाई देऊन एक प्रकारे चेष्टा केली जात आहे. वाढीव नुकसान भरपाई आजच्या वाढीव दराने मिळावी याची दखल देखील सरकारने घेतली नाही.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा