‘सिंधुदुर्ग’ पेन्शनर्स चे वार्षिक अधिवेशन २२ रोजी
सावंतवाडी
गव्हर्नमेंट पेन्शनर्स, फॅमिली पेन्शनर्स, पोस्ट, बीएसएनएल, रेल्वे, आयकर, सेनादल, ब्यूरो ऑफ माईन्स, शिपिंग, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, सेंट्रल पोलीस फोर्स, भाभा अॅटोमिक रिसर्च, सेंट्रल एक्साईज आदी केंद्र सरकारच्या खात्यातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक अधिवेशन २२ मार्च रोजी मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी जनरल सेक्रेटरी पुणेचे एच. एफ. चौधरी, ठाणे संघटनमंत्री एस. बी. सोनार, मुंबई व कोकण जनरल सेक्रेटरी मनोहर पत्की आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. – अधिवेशनात पेन्शनर्सच्या सरकार दरबारी प्रलंबित असणाऱ्या विविध समस्यांबाबत उहापोह करण्यात येणार आहे. सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष डिसोझा, कार्यवाह मोहिते व संघटनमंत्री अॅड. नकुल पार्सेकर यांनी केले आहे