*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आई*
आईचं स्वयंपाक घर
सर्वांसाठी असत खुलं
नाही कधी असत तिथं
भरायची खुप बीलं
संस्काराची तिथं मात्र
असते पुरणपोळी
मृदु कोमल हातांची
आई आपली भोळी
आईच्या घरात मिळते
वात्सल्याची चादर
गोधडीची उब मिळते
अंगाईची झालर
आईच्या घराबाहेर
तुळशी वृंदावन छान
पै पाहुण्यांचा होतो
आईच्या घरात सन्मान
मरण यातना सहन करुन
देते जन्म बाळाला
एक असो चार असो
दुजाभाव ना कोणाला
आईच्या कुशीत मिळते
झोप स्वर्ग सुखाची
हात फिरता डोक्यावर
उब मिळते मायेची
हाक मारतो आईला
तोच जगी भाग्यवान
नसते जगी ज्यांची आई
स्वयंपाक घर सुनसान
आई असता घरी दारी
भिती नाही कधी कोठे
हाक मारता आईला
स्वर्ग असतो दोन बोटे
*शीला पाटील. चांदवड.*