You are currently viewing गेली ती गंगा

गेली ती गंगा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गेली ती गंगा*

 

नाही ठेविला हिशेब कधीही

अधिक किती अन् किती वजा

गेली गंगा तीर्थ राहिले

जीवनातली लुटा मजा

 

कोण जाणतो उद्या काय ते

जगून घ्यावे आजच आता

प्रकाश अथवा निघून जाईल

दिवाकर अस्ताचली जाता

 

गुणाकार वा भागाकार

उत्तर माझे एक असे

बहरून आहे चोहीकडे

आनंदाचे झाड वसे

 

परिघात या फिरताना

सौंदर्यासी टिपून घ्यावे

चंद्राच्या शीतल किरणांतुनी

अमृताचे कण प्राशावे

 

नकोत आयुष्याच्या गणिती

पाढे पावकी किंवा निमकी

उत्तरोत्तर पाठ करावे

सवायकी अन् अडीचकी

 

*अरूणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा