You are currently viewing पान जिर्णसे….

पान जिर्णसे….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पान जिर्णसे…..*

 

गळणारे ते पान जिर्णसे

पक्षी फुलांना सांगत जाईल

आज जरी हा वृक्ष पर्णहीन

उद्या खात्रीने वसंत येईल

 

सुकलेल्या या फांदयामधूनी

कोंब कोवळे दिसू लागतील

घमघमणाऱ्या सुवासासवे

चैतन्याने भारून जातील

 

मंद हवेच्या झोक्या संगे

गंध हळू जाईल पसरून

सुवासास त्या भुलून जाता

याल तुम्ही मग नक्की परतून

 

मी ही येईन तुमच्या संगे

हिरवी हिरवी पाने होऊन

नाचू आपण वाऱ्यासंगे

सुगंधाचे ते लेणे लेऊन

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

@ सर्व हक्क सुरक्षित

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

प्रतिक्रिया व्यक्त करा