सावंतवाडी :
सावंतवाडी येथील क्रशर व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक राजन आंगणे (६१) यांचे कारीवडे भैरववाडी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हा प्रकार आज दुपारी घडला. ते कारिवडे भैरववाडी येथील क्रशर परिरात असलेल्या आपल्या घरात ते मृतावस्थेत आढळले. सायंकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ते मूळचे मालवण आंगणेवाडी येथील असेल तरी ते व्यवसायानिमित्त गेली अनेक वर्षे कारीवडे भैरववाडी येथे राहत होते. सामाजिक क्षेत्रात नेहमी पुढे असणारे आणि सढळ हस्ते मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. सावंतवाडी भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक विद्यालयावर गेली २० वर्षे ते कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या मित्र परिवाराकडून कुटीर रुग्णालयात मोठी गर्दी करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.