*कविता हा अंतर्मनातील भावनेचा आविष्कार असतो… ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते*
निगडी पुणे येथील सावरकर सदन येथे काव्यानंद प्रतिष्ठान आयोजित स्व. चिंतामणराव पोटे काव्यमित्र पुरस्कार २०२३ वितरण प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री. वि. ग. सातपुते बोलत होते. कविता लिहिता येणं ही साक्षात भगवंताची कृपा आहे आपल्या घरातील ज्येष्ठांनी घडवलेले संस्कार, आपल्याला लाभलेला सहवास कवितेतून व्यक्त होत असतो असे ते म्हणाले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पिंपरी चिंचवड साहित्य मंचचे अध्यक्ष श्री. राजेंद्र घावटे हे लाभले होते. राजेंद्र घावटे यांनी मराठी भाषा कशी समृध्द आहे यावर भाष्य केले. ते म्हणाले जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत मराठी भाषा राहील. भारतात चौथ्या क्रमांकावर बोलली जाणारी आपली माय मराठी आहे. जगातील वैभवशाली भाषांपैकी आपली मराठी ही एक
भाषा आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष श्री. राज अहेरराव हे उपस्थित होते.
राज अहेरराव यांनी नव कवींना अनमोल मार्गदर्शन केले. कविता जगायला शिकवते. आपली कविता नुसती लिहिली जात नाही तर ती आपल्याकडून घडवून घेतली जाते. कवींनी बदलत्या काळानुसार बदल आत्मसात केले पाहिजे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. तिन्ही मान्यवरांनी सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनिल खंडेलवाल यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखिका सौ.वंदना ताम्हाणे यांनी केले. काव्यानंदचे सचिव श्री. विवेकानंद पोटे यांनी गणेश वंदना तर कु. भाग्या खंडेलवाल हिने गुरुवंदना सादर केली.
स्व. चिंतामराव पोटे काव्यमित्र पुरस्कार २०२३ हा पुणे येथील कवयित्री सौ. आरुशी दाते यांना प्रदान करण्यात आला.
काव्यानंद प्रतिष्ठान तर्फे प्रकाशित मराठी भाषा गौरव दिन विशेषांकाचे प्रकाशन ही यावेळी करण्यात आले. कविवर्य सुभाष धाराशिवकर यांच्या शब्द दिंडीतला वारकरी व अक्षर बंध या दोन्ही काव्यसंग्रहाचे आणि कवयित्री भाग्यश्री मोडक यांच्या भावशिल्प या काव्य संग्रहाचे प्रकाशन यावेळी संपन्न झाले.
या प्रसंगी प्रा.तुकाराम पाटील, अशोक कोठारी, माजी प्राचार्य पी.बी.शिंदे, शोभाताई जोशी, धाराशिवकर मित्र परिवार, मोडक परिवार, पोटे परिवार व अनेक रसिक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता पसायदान गायनाने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल शेळके, समीर मुल्ला व वंश खंडेलवाल या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले.
– सुनील खंडेलवाल
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.