घात
कधीतरी पडताना तिने मला,
सावरलं होतं स्वतःच्या हाताने.
सर्वार्थाने दूर सारलं तरी,
काही काळ बांधलं होतं नात्याने.
एकांतातले गुज अमुचे,
ऐकले होते पिसाटलेल्या वाऱ्याने.
लाटांवर स्वार तिचे शब्द,
आदळताना झेलले होते किनाऱ्याने.
वाळूवरचे तिचे नी माझे नाव,
पुसले होते हलकट त्या पाण्याने.
उडत्या प्रेमाची आठवणच जणू,
मिटली होती पाण्याच्या बहाण्याने.
तेव्हा तिचं सोडून जाणं मला,
न दिसलं होतं भाबड्या नजरेने.
गळा तिने कधीच कापला होता,
तुटलेल्या तिच्याच डोईवरच्या केसाने.
(दिपी)✒️
८४४६७४३१९६