You are currently viewing स्मृति भाग ५८

स्मृति भाग ५८

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ५८*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आपण *दक्ष स्मृति* पहात आहोत . त्याच पाचवा अध्याय *शौचाचाराचा* ( शुध्दिचा ) येतो . सध्या कोरोनाचे वर्चस्वाने ब्राह्मणी वा जैन शौचाचाराची मुक्तकण्ठाने खिल्ली उडवणार्‍यांचे तोंडात खीळ बसली आहे !! सगळे तोंडाला मुखरं गुंडाळत आहेत आणि येता—जाता हातपाय धुवत आहेत!😂😂 शौचासाठी ( शुद्धिसाठी ) सदा यत्नशील राहिले पाहिजे , कारण शौचच द्विजांचे ( म्हणजे ब्राह्मण—क्षत्रिय व वैश्यांचे ) जीवनाचा आधार आहे . जो शौचाचार हीन आहे त्याचे सर्व कार्यकलाप विफल आहेत . १)बाह्यशौच , २) आभ्यंतर शौच , असे दोन प्रकारचे शौच सांगून बाह्यशौच माती व जलाने आणि आभ्यंतर शौच विचारांचे शुद्धिने करावे , असे सांगितले आहे .

 

*अशौचाद्धि वरं बाह्यं तस्मादाभ्यंतरं वरम् ।*

*उभाभ्याञ्च शुचिर्यातु स शुचिर्नेतरः शुचिः ॥*

अशौचापेक्षा बाह्यशौच चांगले व बाह्यशौचापेक्षा आभ्यंतर शौच चांगले आहे . जो दोन्ही प्रकारचे शौचाने पवित्र आहे , तोच पवित्र आहे , अन्य नाही .

ह्या श्लोकाधारे किती पवित्र निघतील ? कठीण आहे आज !! पूर्वीचे काळी सगळे शौच पाळले जात होते . यंत्रयुगाने शौचप्रमाण मागता मागता एच् आयव्ही आला ,चिकनगुनिया आला , बर्ड फ्ल्यू आला , स्वाईन फ्ल्यू आला , सार्स आला , आता कोरोना आला , तरी शौचाचार सांगणारा ब्राह्मण अजून सर्वांचे नजरेत वाईटच आहे !!! कमाल आहे ना भारतीय हीन राजकारणाची ?? ही माणसे विचारांनी अशौचच ! आणि अस्पृश्य या शब्दावर जर बंदी असेल तर अशौच शब्द काय वाईट आहे ? पुढे गृहस्थापेक्षा ब्रह्मचारी , वानप्रस्थी व संन्यासी यांचा शौचाचार क्रमाने दुप्पट , तिप्पट व चौपट असतो , हे ही सांगून ठेवले आहे . पुढे एक सुंदर श्लोक येतो .

 

*मृदा जलेन शुद्धिः स्यान्न क्लेशो न धनव्ययः ।*

*यस्य शौचेSपि शैथिल्यं चित्तं तस्य परीक्षितम् ॥*

माती अथवा जलाने शुद्धि केली गेली पाहिजे . त्याने ना कष्ट होतात ना धनव्यय !! तरीसुद्धा जे शौचाचारात शिथिलता दाखवतात त्यांचे चित्ताची परिक्षा झालेली असते !! ( की अशी माणसे परम आळशी असतात म्हणून !! )

विप्रांचे ( म्हणजे ब्राह्मण , क्षत्रिय व वैश्य असे तीन ही वर्ण पण ज्यांचेवर संस्कार झाले आहेत ते , असंस्कारी नाही !! फार पूर्वी शूद्र म्हणजे परकीय मानला जात असे , असे ऐकिवात आहे . !! ) दिवसाचे व रात्रीचे शौच वेगवेगळे असतात . विपत्तीमधील शौच वेगळे व समृद्धि असतांनाचे वेगळे असते , असे सांगून पुढे दिवसाचे शौचापेक्षा रात्रीचे अर्धे , रात्रीपेक्षा आजारातील अर्धे व यात्रासमयी घाईमुळे ते आजारापेक्षा अर्धे असते , असे सांगितले आहे . केवढी काळजी !! एवढी काळजी तर आजचे पैशाचे मागे लागलेले आई—बाप ही करत नसावेत !! नंतर तर सगळ्यात महत्वाचा श्लोक येतो व अध्याय संपतो .

 

*न्यूनाधिकं न कर्तव्यं शौचे शुद्धिमभिप्सिता ।*

*प्रायश्चित्तेन युज्येत विहितातिक्रमे कृते ॥*

शुद्धिचा विचार करणाराने शौच विषयात कमी—अधिक हा विचार कधीच करु नये !! सांगितलेल्या शौचाचे अतिक्रमणाने ( म्हणजे अति केल्याने ) मनुष्य प्रायश्चित्तास प्राप्त होतो !!

इथे मी सांगू इच्छितो की बर्‍याच लोकांनी ( जास्त करुन ब्राह्मणांनी ) शौचाचाराचा अतिरेक केल्याने तो हळूहळू नष्ट होत आज या थराला पोहोचलाय की आम्हास व्हायरस शिकवतोय व सगळे खाली मान घालून शिक्षेसारखे शौचाचार पाळताहेत !!!!!! पण त्यातही अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष पाहून स्वमनाने कमीअधिक पाळणे आहेच !!!! जे मुळात शास्त्रविरुद्ध आहे .😂😂😂😂

आज थांबतो . तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८ ८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा