*एस .पी. ऑटोहब तर्फे रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयास टाटा हॅरीअर कार्स चे वितरण*
रत्नागिरी
देशातील अग्रगण्य वाहन निर्माते टाटा मोटर्स आणि त्यांचे भारतातील अग्रगण्य डीलर नेटवर्क एस.पी. ऑटोहब यांचे तर्फे महिला दिन आणि महाशिवरात्री चे औचित्य साधून नुकतेच एका छोटेखानी शानदार कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय ला टाटा हॅरीअर चे वितरण करण्यात आले.
सदर कार्स चे वितरण प्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. धनंजय कुलकर्णी सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड मॅडम यांनी कार अनावरण करून किल्ल्याचा स्वीकार केला.
या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तर्फे राखीव पोलीस निरीक्षक श्री.रमेश निकम, उप निरीक्षक श्री.तारये, कार्यालय अधीक्षक श्री.मनोज सावंत, प्रमुख लिपिक श्री.निलेश पवार आणि श्री.चैतन्य पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार सेफ्टी रेटिंग अंतर्गत नव्यानेच लागू झालेली स्वायत्त भारतीय वाहन सुरक्षितता प्रणाली *भारत एन कॅप* ने सर्व प्रथम टाटा हॅरीअर आणि टाटा सफारी या एसयुव्हीं श्रेणीतील एकमेव कार्स ने भारतात प्रमाणित होणाऱ्या पहिल्या कार्स चा सन्मान मिळविला आहे.
ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग मध्ये आपला ठसा जागतिक पटलावर उमटल्या नंतर देखील संपूर्ण स्वदेशी अभियान अंतर्गत भारत सरकारने लागू केलेली पूर्णतः भारतीय *भारत एन कॅप* ५ स्टार सेफ्टी रेटिंग प्राप्त करणारी टाटा मोटर्स ही पहिली कंपनी ठरली आहे.
सुरक्षितता आणि सोई सुविधा हे प्राधान्य ठेउन संपुर्ण स्वदेशी बनावटीच्या टाटा कार्स ची निवड केल्याचे कार्यालय तर्फे सांगण्यात आले.
आपल्या रत्नागिfरी, चिपळुण आणि कणकवली येथील शोरुम मधून
अल्पावधीत आपली विक्री आणि विक्री पश्चात सेवा मुळे ग्राहकांचे प्रथम पसंतीस उतरलेली आणि सर्वोत्तम रेटिंग प्राप्त केलेली एस.पी.ॲाटोहब ही कोकणातील पहिलीच डिलरशीप ठरत आहे.
संपूर्ण स्वदेशी अभियान अंतर्गत टाटा मोटर्सच्या वाहनांना मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय आहे.
एस.पी. ग्रूप ने गोवा, गुजरात,राजस्थान येथील अभूतपूर्व अशा यशानंतर महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा द्वारे प्रवेश केला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुशिक्षित सेल्स आणि सर्व्हिस ने परिपूर्ण असे रत्नागिरीतील सर्वात मोठे असे वातानुकूलित शोरुम ग्राहकांच्या सेवे करिता उपलब्ध करून दिले आहे.
कार्स श्रेणी मध्ये टाटा टियागो टिगोर पेट्रोल आणि सी.एन.जी. ऑटोमॅटिक,
न्यू नेक्सोन पेट्रोल आणि डिझेल, पंच, अल्त्रोझ, अशा सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.
नुकतीच टाटा ने टियागो आणि टिगोर या कार्स सी.एन.जी.मध्ये ऑटोमॅटिक पर्याय सगुत उपलब्ध करून दिली असल्याने आणि भारताची सर्वात जास्त विकली जाणारी नेक्सोंन नविन रुपात सादर केलेने सदर कार चे बुकिंग ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे
ग्राहकांनी अधिक माहिती करिता आमचे नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा आणि टाटा कार च्या संपूर्ण स्वदेशी अभियानाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन अरुण देशपांडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.