नाटळ येथील ६० कोटीच्या धरणाला शासनाची मान्यता*
कणकवली
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत नाटळ-राजवाडी येथील लघुधरणाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या सुमारे ६० कोटीच्या धरण प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या लघुधरणासाठी आमदार नीतेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते. तसेच जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ. संजना सावंत यांनी धरणाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.भिरवंडे-गांधीनगर येथील धरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच केल्यानंतर नाटळ येथील लघुधरणाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने नाटळ मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे. यापुढेही राणेंच्या मार्गदर्शनाखाली विकासाला निधी कमी पडू देणार नाही. या धरणाच्या माध्यमातून आमदार नीतेश राणे यांनी देऊ तो शब्द पूर्ण करू, याची प्रचिती दिली आहे, • अशी प्रतिक्रिया संदेश सावंत व संजना सावंत 4 यांनी व्यक्त केली आहे.राजवाडी येथे मृद जलसंधारण खात्यामार्फत लघुधरण बांधले जावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केले होती. धरण मंजूर करून आणणार असल्याचा शब्द राणे यांनी दिला होता. २५० हेक्टर जलसिंचन क्षमता असणारे हे धरण होणार आहे. या धरणाची २४३५ स. घ. मी. एवढी पाणी साठवण क्षमता असणार आहे. या धरणासाठी ६० कोटी २१ लाख ६४ हजार चारशे रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या धरण प्रकल्पामुळे नाटक-राजवाडी परिसरातील गावांची पाणीटंचाई दूर होणार असून शेतकऱ्यांना उन्हाळी व बागायती शेतीसाठी वापर करता येणार आहे. धरणाबाबत गावपुरुष बबन सावंत, सरपंच सुनील घाडीगावकर, उपसरपंच तायशेटे यांनी सातत्याने राणे, सावंत यांचे लक्ष वेधले होते. धरणामुळे नाटळ गावातील जवळपास १०१ ते २५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून गाव सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदत होणार आहे. धरण मंजुरीमुळे ग्रामस्थांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.