You are currently viewing स्मृति भाग ५६

स्मृति भाग ५६

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ५६*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आपण दक्ष स्मृति पहात आहोत . काही श्लोक .

 

*त्रयाणामाश्रमाणान्तु गृहस्थो योनिरुच्चते ।*

*तेनैव सीदमानेन सीदन्तीहेतरे त्रयः ॥*

गृहस्थाश्रम उर्वरीत तीनही आश्रमांची योनि आहे . तो नष्ट झाल्यावर शेष तीनही आश्रम ही नष्ट होतील !!

गृहस्थाश्रमाचे महत्व किती मोजक्या शब्दात समजावले आहे ना !! खरं तर या आश्रमावरच धर्म टिकून आहे ! कारण वंश टिकला तरच धर्म ! अन्यथा सगळे फुस्स् ? मग पुढे गृही कुणास म्हणावे ? ते पहा—

 

*दया लज्जा क्षमा श्रद्धा प्रज्ञा योगः कृतज्ञता ।*

*एते यस्य गुणाः सन्ति स गृही मुख्य उच्चते ॥*

दया , लज्जा , क्षमा , श्रद्धा , बुद्धि , योग आणि कृतज्ञता — हे गुण ज्याच्यात असतात तोच उत्तम गृहस्थ असतो .

आपण कुठे आहोत ? हे प्रत्येक गृहस्थाने पडताळून पहायला हरकत नाही !! पुढे तिसर्‍या अध्यायात गृहस्थासाठी नऊ नवक सांगितले आहेत .

१)नऊ सुधा ,

२)नऊ ईषद् दान ,

३)नऊ उत्तम कर्म ,

४)नऊ निकृष्ट कर्म ,

५)नऊ गोपनीय कर्म ,

६)नऊ प्रकाशन योग्य कर्म ,

७)नऊ सफल कर्म ,

८) नऊ असफल कर्म ,

आणि

९)देण्यास अयोग्य असलेल्या नऊ वस्तू .

 

पुढे एक छान श्लोक येतो .

 

*सुखं वाञ्छति सर्वे हि तच्च धर्म समुद्भवम् ।*

*तस्माद्धर्मः सदा कार्य्यः सर्व वर्णः प्रयत्नतः ॥*

सुखाची इच्छा सर्वच करतात . आणि तो धर्मामुळे निर्माण होतो . म्हणून सर्व वर्णांनी नेहमी धर्मकार्य करावयास हवे .

हा श्लोक वाचल्यावर ‘ स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे ‘ मूर्खच वाटतात ना ? खरंतर त्यांना धर्मच समजलेला नसतो !! आणि आतापर्यंत तर कहरच केला होता !! राष्ट्रच धर्मनिरपेक्ष ठरवू पहात होते ? जगातलं कोणतं राष्ट्र धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे ? अमेरिका , चीन वा इतर बर्‍याच मुस्लीम राष्ट्रात धर्माधारित हत्या होतात व सरकार बोलत नाही ? आणि भारतात हे धर्मनिरपेक्ष !! माज माज माजले होते !! पण *जनता जनार्दन* खरंच सगळ्यांची पावलं ओळखतो !! नमस्कारच जनवैष्णवास !! आणखी बर्‍याच गोष्टी गृहस्थासाठी सांगून तिसरा अध्याय संपतो . उद्या पुढील अध्याय पाहू .

आज थांबतो . तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा