*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि.ग.सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अतृप्त लोचने*
***************
शब्दरूप तुच , तूच कविता
सुगंधा तुच , मनभाव गंधली
भावरूपे , आळवीत जाता
गीतात , अव्यक्ते ओघळली….
अंतर्यामी , स्वरानंद श्रद्धेचा
उमलुनी येते गीतगंधाली
दरवळलेले सारे चराचर
प्रीती ती अंतरीच रुतलेली….
शब्दात व्यक्त होणे अवघड
आज भावनांच मुसमुसलेली
भिरभिरणाऱ्या अतृप्त लोचनी
तुझी अनंत रूपे पाझरलेली….
*************************
*रचना क्र.३९ / १२ / ११ / २०२४*
*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी)*
*📞(9766544908)*