You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन

श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन

श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन

सावंतवाडी

आजची युवा पिढी व्यसनांच्या आहारी गेलेली दिसते. चांगल्या माणसांच्या संगतीत राहा. संघर्षाचा काळ आला तरी गांजा, कोकेन, अफू अशा व्यसनांपासून लांब राहा. मोठी स्वप्ने पहा. अपयशाने खचून न जाता मी जिंकून तेव्हाच शर्यत संपेल अस ध्येय ठेवा. असे प्रतिपादन श्री प्रमोद पाटील PSI सावंतवाडी यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी केले.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सि. जि. शि. प्र. मंडळाच्या विश्वस्त युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे लखमसावंत भोसले, महिला व बाल कल्याण समुपदेशन केंद्राच्या समुपदेशिका श्रीमती अर्पिता वाटवे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य एम. ए. ठाकूर, महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. नीलम धुरी, महिला विकास कक्षाच्या सर्व सदस्या व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, आज सिंधुदुर्ग जिल्हा साक्षर आहे. पण UPSC, MPSC परीक्षांमध्ये विद्यार्थी पास होण्याचं प्रमाण कमी आहे, अधिकारी होण्याच प्रमाण नगण्य आहे. शासकीय यंत्रणेमध्ये काम करण्याची विद्यार्थ्यांची उदासीनता याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आवश्यक कामासाठी मोबाईलचा वापर करावा. मोबाईलचा अतिरेक आणि त्याचे दुष्परिणाम आपण पाहत आहोत. त्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. मोबाईल वरील निनावी मॅसेजना बळी पडू नका. ब्लॅकमेलचे प्रमाण वाढत चालले आहे. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. वेबसाईटस, चॅट रूम्स, इंटरनेटवरील चर्चा घडविणारी व्यासपीठे, ब्लॉग इत्यादी प्रकार आणि ईमेल या माध्यमाद्वारे गुन्हेगार आपल्या बळींना लक्ष्य करतात. मुलींनी यापासून सावधगिरी बाळगा, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा नेहमीच सज्ज आहे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्थेच्या विश्वस्त युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोंसले यांनी उपस्थित विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. आजच्या काळात कोणत्याही परिस्थितीत मुलींनी खंबीरपणे परिस्थितीला  तोडे दिल पाहिजे. इथून पुढील काळात सर्व सत्रामध्ये विकासाच्या संधी आहेत. त्या संधीचा सकारात्मक दृष्टीने विचार करून त्या त्या क्षेत्रामध्ये करियर करा. त्यांनी विद्यार्थीनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिला व बाल कल्याण केंद्राच्या समुपदेशिका श्रीमती अर्पिता वाटवे यांनी फेसबुकचा गैरवापर करून फेक मेसेजना ऊत आला आहे. त्याला बळी पडू नका. अन्याय सहन न करता पोलीसांमध्ये तक्रार करा, अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवला तरच समाजात आपण ताठ मानेने जगू शकतो. स्वसंरक्षणासाठी सज्ज व्हा. सावंतवाडी महिला व बाल विकास कल्याण समुपदेशन केंद्र सदैव मदतीसाठी तत्पर आहे. असे प्रतिपादन केले.

यावळी विविध स्पर्धामधे सहभाग व प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. कु सुप्रिया राऊळ या विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. नीलम धुरी यानी तर आभार प्रा. सुप्रिया केसरकर यांनी मानले.

सूत्रसंचालन सिद्धी बोंद्रे व पूजा कारिवडेकर यांनी केले.

फोटो

प्रमुख अतिथी प्रमोद पाटील PSI सावतवाडी, अर्पिता वाटवे. प्र. प्राचार्य महेंद्र ठाकूर, युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोंसले, प्रा. नीलम धुरी व प्राध्यापिका

प्रतिक्रिया व्यक्त करा