You are currently viewing धनाढ्य श्रीमंतांच्या गर्दीत

धनाढ्य श्रीमंतांच्या गर्दीत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ (अर्थात कुसूमाई) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*धनाढ्य श्रीमंतांच्या गर्दीत*

 

धनाढ्यांचा मेळावा भरला होता

त्यात एक गरीब शिरला होता

सारेच त्याला दुर करत होते

कोणीच जवळ घेत नव्हते

 

श्रीमंत सारे एकत्र जमले होते

एकमेकात सर्व रमले होते

मैफील त्यांची रंगली होती

एका गरीबामुळे ती भंगली होती

 

श्रीमंत सारे एकमेकांना भेटत असतात

मजा मस्ती आनंदात दिसतात

रूबाब त्यांचा देखणा असतो

गरीब मात्र एकसारखं पहात असतो

अंगावर सुवर्ण भरजरी साज दिसतो

थाटमाट त्यांचा भारी असतो

श्रीमंत सारे तोऱ्यात राहतात

गरीबारा पाहून टाळत असतात

 

खरंतर माणूस श्रीमंत नसलात तरी

श्रीमंतांच्या गर्दीत दिखाऊपणाच

दाखवायचा असतो

माणसांपेक्ष तोच मोठा दिसतो

इथे असण्या पेक्षा दिसन्याला

जास्त महत्त्व असते

त्याशिवाय मोठेपण मिळत नसते

 

म्हणून आतून गरीब असलात तरी

अंगावर श्रीमंत कपडे असले पाहिजे

गाडी घोडी नसली तरी

फक्त श्रीमंत दिसले पाहिजे

कारण‌ ईथे श्रीमंतीलाच जास्त भाव असतो

पैशावाल्यांचाच उदोउदो दिसतो

गरिबीला कोणीच किमंत देत नाही

अपलं म्हणून कोणी जवळही घेत नाही

 

या जगात माणसाला काहीच मोल नसते

माणसापेक्षा पैशालाच जास्त महत्त्व असते

म्हणून माणूस श्रीमंत नसला तरी चालेल

पण त्याने गरीबीची लाज ठेऊ नये

आहेत त्यातच समाधान मानावं

उगाच पैशा मागे धाऊ नये

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसूमाई)*

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा