You are currently viewing पनवेलकर ज्वेलर्स”च्या नव्या दालनाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन…

पनवेलकर ज्वेलर्स”च्या नव्या दालनाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन…

“पनवेलकर ज्वेलर्स”च्या नव्या दालनाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन…

सावंतवाडी

सावंतवाडी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या “पनवेलकर ज्वेलर्स”च्या नव्या दालनाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशीच प्रगती करत रहा, ग्राहकांना उत्तम सेवा देवून अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवा, अशा शुभेच्छा यावेळी पनवेलकर कुटुंबीयांना केसरकर यांनी दिल्या.

दरम्यान उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलकर ज्वेलर्सच्या माध्यमातून मजुरीवर ३० टक्केची विशेष सूट देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेलकर ज्वेलर्सच्या माध्यमातून राजू पनवेलकर यांनी केले आहे.

यावेळी सुवर्णकार राजेश पनवेलकर, मधुरा पनवेलकर, दयानंद कारेकर, विक्रम गोरेगावकर, राकेश धोत्रे, राजेंद्र मडगावकर, राजन पोकळे, नंदू शिरोडकर, नरसिंह गुवणेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =