आमदार नितेश राणे यांनी अल्पसंख्यांक ग्रामीण क्षेत्र विकासासाठी आणला एक कोटीचा निधी
*आम.राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने विकास निधीची केली तरतूद
*अर्थसंकल्पीय तरतुद करून कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी दिले एक कोटी
*अल्पसंख्यांक बहुल गावे,वाड्या,वस्तीमधील रखडलेली कामे पूर्णत्वास जाणार
कणकवली
आमदार नितेश राणे यांनी अल्पसंख्यांक बहुल वाड्या,वस्ती,गावे यांच्या विकासासाठी विशेष निधी मिळावा यासाठी सातत्यपूर्ण मागणी आणि पाठपुरावा केला होता, या मागणीला यश आले आहे.राज्य सरकारने अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत कणकवली-देवगड -वैभववाडी मतदार संघामध्ये एक कोटी रुपयांची विकास कामे आमदार नितेश राणे यांच्या मागणी नुसार मंजूर केली आहेत.त्या विकास कामांना मंजुरी दिल्याने आदेश जिल्हाधिकारी आणि संबधित खात्याला दिले आहेत.
या विकास कामात कणकवली तालुक्यातील साकेडी मुख्य रस्ता ते मुस्लिमवाडी मशीदीपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. १० लाख , वरवडे मुख्य रस्ता ते वरवडे मुस्लिमवाडी इब्राहीम आदम हाडकर घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. ८ लाख. हरकुळ बुद्रुक कब्रस्थानमध्ये स्ट्रीटलाईट बसविणे. ४ लाख. हुंबरट कब्रस्थानमध्ये स्ट्रीटलाईट बसविणे ५लाख. वरवडे वरवडे कब्रस्थानमध्ये पेवर ब्लॉक बसविणे व फुटपाथ बांधणे. ५ लाख,कणकवली सांगवे
शास्त्रीनगर येथील शास्त्रीनगर ख्रिश्चन दफनभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. १०लाख.कणकवली हरकुळ बुद्रुक कब्रस्थानला कंपाऊंड बांधणे. १० लाख.
देवगड गिर्ये मुस्लिमवाडी तरबंदर ते मशीद पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. ५.लाख, विजयदुर्ग कब्रस्तान येथे सोलार हायमास्ट बसविणे. ५.लाख. देवगड तिर्लोट मुख्य रस्ता ते मुस्लिमवाडी दादन घर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. ८लाख.
वैभववाडी कोळपे जमातवाडी बादशहा नंदकर घर ते इस्माईल नाचरे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे. १० लाख. वैभववाडी तिथवली काझीवाडी मुख्य रस्ता ते मठखुर्दकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. ५.लाख.वैभववाडी उंबर्डे उंबर्डे मेहबूबनगर नाचरेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. १५.लाख असे एकूण एकूण एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.