You are currently viewing गुलाबस्तवन……३४ वे…!!

गुलाबस्तवन……३४ वे…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी, गुलाबनवाझ बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलाबस्तवन……३४ वे…!!*

 

मनी उठले प्रेमभाव

जीवाचा होई भोवरा

उजळलं परब्रम्ह दृष्टीला

माती नाचे गरागरा..

 

फुलली प्रणयातुर सृष्टी

जीव झाला बावरा

पाकळ्यांत उभं परब्रम्ह

डोलतो आसमंत सारा..

 

नादब्रह्मात खुणावते साजणवेळं

सुखकायेचा अंगणी पसारा

लावण्यकेसरांचा फुलला मधुगंध

आनंदविभोरात नाचला वारा..

 

ओलांडून अंगण माझं

मला नाव दिलसं

उभारणी माझ्या काळजाची

मला ओळख दिलीसं.

 

ईश्वराची सेवा करायचं

मला वरदान दिलसं

बंधनातूनही मुक्त असावं

ह्दयी संदेश रूजवलासं..

 

मधुर निमंत्रण तुझं

जगण्याला संमोहन दिलसं

सौंदर्य तुझं जपण्यास

देशाचा आशिर्वाद दिलासं..

 

गुलाबा !अजून काय हवं असत रे

माझं जगणचं तुझ्या करता रे..

इथून निघेपर्यंत तुझी सोबत हवी

मधूनचं मला सोडून जाऊ नकोस रे

 

बाबा ठाकूर, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा