तळवडे येथे १२ मार्चला मोफत आरोग्य तपासणी शिबीर…
वेंगुर्ले
अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर व डॉ. सौ. अफशान कौरी व श्री. ओंमकार वसंत पडते यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार १२ मार्चला सकाळी १० ते २ या वेळेत तळवडे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सिद्धरामेश्वर कॉप्लेक्स, (पडते बिल्डिंग), तळवडे बाजारपेठ येथे होणाऱ्या या आरोग्य शिबिराचा अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयविकार, कॅन्सर ऑपरेशन, मेंदू व मणका ऑपरेशन, दुविणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन यांच्याशी संबंधित रुग्णांनी लाभ घ्यावा. तसेच नोंदणीसाठी डॉ. कौरी – 9422967778, श्री. ओंकार पडते – 7038477372, श्री. संजय तानवडे – 9130650102 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.