You are currently viewing रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा वैद्यकीय आघाडी संयोजक डाॅ. अमेय देसाई यांचा वेंगुर्लेत सत्कार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा वैद्यकीय आघाडी संयोजक डाॅ. अमेय देसाई यांचा वेंगुर्लेत सत्कार

*रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा वैद्यकीय आघाडी संयोजक डाॅ. अमेय देसाई यांचा वेंगुर्लेत सत्कार*

देशात येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनांना बळकटीकरण देण्याला वेग आलेला दिसत आहे. नुकत्याच झालेल्या इंडिया टूडे सर्वेक्षणानुसार पुन्हा एकदा भारतात मोदीपर्व येण्याचे संकेत दिले असून देशातील जनतेचा कौल भारतीय जनता पक्षाच्या दिशेने असल्याचे समोर आले आहे. असे असले तरी पक्षांतर्गत लोकशाही आणि पक्षशिस्त याकरिता ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष आपल्या संघटनात्मक रचनांवर नेहमीच काम करत असतो. याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीच्या संघटनात्मक रचना नुकत्याच जाहीर करण्यात आल्या ज्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेकरिता संयोजक म्हणून डॉ अमेय देसाई यांची निवड करण्यात आली. निवडी नंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर आलेले डाॅ. अमेय देसाई यांचा सत्कार वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला .
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रासरुट ला काम करणारे डॉ देसाई विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत सुद्धा तितक्याच सलोख्याचे संबंध प्रस्थापित करुन आहेत. तळकोकणातील सर्वसामान्यांसोबत त्यांची जुळलेली नाळ , संघपरिवाराची त्यांची पार्श्वभूमी आणि राज्यातील नेतृत्वासोबत असलेला त्यांचा थेट संपर्क या सगळ्या गोष्टी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजप ला विजयश्री खेचून आणण्यासाठी निश्चीत उपयोगी पडेल असे प्रतिपादन शरदजी चव्हाण यांनी सत्कार प्रसंगी केले .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक राणे , नगराध्यक्ष राजन गिरप , जेष्ठ नेते प्रकाश रेगे , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , NGO आघाडीचे विजय रेडकर , महीला शहर अध्यक्षा श्रेया मयेकर , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर , शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर , संदिप पाटील , कामगार आघाडीचे प्रशांत नवार तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा