*सावंतवाडीतील ट्वेंटी-ट्वेंटी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत संवाद मीडिया संघाचा दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश*
*रविवारी होणार संवाद मीडिया सिंधुदुर्ग—गोवा पोलीस यांच्यात अंतिम लढत*
सावंतवाडी
एस. एन.आर.आर ग्रुप सावंतवाडी आयोजित लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात संवाद मीडिया डिजिटल न्यूज चॅनल संघ विजेता ठरला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात कुडाळ संघाविरुद्ध गोवा संघ अंतिम फेरीत दाखल झाला. रविवारी दुपारी १२ वाजता सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर संवाद मीडिया सिंधुदुर्ग विरुद्ध गोवा पोलीस संघ यांच्यात अंतिम सामना होणार आहे.
अतिशय नियोजनबद्ध एस एन आर आर ग्रुप सावंतवाडी यांनी जिमखाना मैदानावर ट्वेंटी-ट्वेंटी षटकांचे सामने आयोजित केले.२४ फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला.
चार चार संघांच्या गटात साखळी पद्धतीने घेण्यात आलेल्या सामन्यात गट विजेता संघ संवाद मीडिया आणि गोवा पोलीस संघ अंतिम फेरीत दाखल झाले.
सकाळच्या सत्रातील उपांत्य फेरीतील पहिला सामना संवाद मीडिया आणि ओम स्पोर्ट संघ सावंतवाडी यांच्यात खेळविण्यात आला. ओम स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून संवाद मीडिया संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना संवाद मीडिया संघाने २० षटकात ८ बाद ११५ धावा जमविल्या. सलामीचा फलंदाज शिवेंद्र भुजबळ याने ५० चेंडूत ६५ धावा केल्या. तो शेवटच्या गड्याच्या रूपात धाव बाद झाला. त्याला साथ देताना दिपराज गावकर ने २५ चेंडूत १६ व सुरज बल्याळ याने १३ चेंडूत १५ धावा केल्या.
११६ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या ओम स्पोर्ट्स संघाचे २ फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने या संघाची अवस्था २ बाद १ अशी झाली. ओम स्पोर्ट संघ १९.२ षटकात सर्वबाद ९९ धावा जमवू शकला आणि १६ धावांनी ओम स्पोर्ट संघाला पराभव स्वीकारावा लागला. संवाद मिडिया संघाने मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.
ओम स्पोर्ट चा गोलंदाज सागर उद्देशी ने ४ षटकात २२ धावा देत ३ बळी टिपले. तर राहुल मेहता, फैयाज खान, सलील आगरकर यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.
संवाद मीडियाचे गोलंदाज मोहित रेडकर ने ३ बळी, शुभम तारी, सुरज बल्याळ, दिपराज गावकरने प्रत्येकी २ बळी मिळविले. संवाद मीडियाच्या विश्वनाथ रेगे यांनी टिपलेले प्रेक्षणीय २ झेल निर्णायक ठरले. सामनावीर म्हणून शिवेंद्र भुजबळ याला आयोजक संतोष केनवडेकर यांच्या हस्ते सामनावीर पारितोषिक प्रदान करण्यात आले.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*