*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम अहिराणी बोलीतील काव्यरचना*
*माय…*
माय माय माय करू
घरले लागी गे कुलूप
वट्टा पडना उघडा
उघडा पडना मुलूख…
सुन्या व्हयन्यात भित्ती
तिसना पोपडा उडना
मायना सावली बिगर
वट्टा झाया किलावना…
येये जाये उभा ऱ्हाये
आंगनम्हा तो मानूस
गये वावर उलगी
आते फिरस मुंगूस …
तोंडभरी हाका मारे
भाऊ दादा बठ ना रे
घोटभर चहा ले का
करस परायी तू माले ..
घटकाभर बसेत त्या
वट्टा कानम्हा ते भरे
याद येस माय त्याले
खंगी ग्या तो आते मारे..
गया उचडीपाचडी
पार रया गयी त्यानी
मायना त्या राजम्हानं
त्यानी व्हती आबादानी…
येये जाये उभा ऱ्हाये
माय संगे तो चावये
माय काय गयी देखा
बठ्ठ गये ना उजाये …
प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
(९७६३६०५६४२)