You are currently viewing आम्ही केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्याशी एकनिष्ठ; वरवडे येथील मुस्लिम समाज बांधवांची ग्वाही

आम्ही केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्याशी एकनिष्ठ; वरवडे येथील मुस्लिम समाज बांधवांची ग्वाही

आम्ही केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्याशी एकनिष्ठ; वरवडे येथील मुस्लिम समाज बांधवांची ग्वाही

*कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही,

*कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांची समाजबांधवांनी भेट घेऊन दिली ग्वाही

*उबाठा पक्षप्रवेशाची ती बातमी आणि त्यातील नावे खोटी; झाले स्पष्ट

कणकवली

आम्ही राणेंचीच माणसे.आम्हाला कोणत्याही पक्ष संघटनेत बांधू शकत नाही. मुस्लिम समाजातील वरवडे गावचा नागरिक हा केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी एकनिष्ठ आहे.आम्ही कोणत्याही पक्षात गेलो नाही. कोणताही पक्ष प्रवेश केलेला नाही. आमची नावे देवून खोटी बातमी प्रसिद्ध केली. आम्ही राणे साहेबांचे सोबत कायम राहणार. अशी ग्वाही वरवडे येथील मुस्लिम समाज बांधवांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन दिली.
कणकवली तालुक्यातील वरवडे गावातील मुस्लिम समाजाने आमदार नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.आम्ही केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्याच सोबत कायम असून,राणे साहेबाना सोडुन आम्ही कुठेही जाणार नाही.राणेंच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. उबाठा पक्षात आम्ही पक्ष प्रवेश केलेला नसतानाही आमची नावे प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे वरवडे येथील मुस्लिम बांधवांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेवून सांगितले.
दोन दिवसांपूर्वी ऊबाठा सेनेने वरवडे गावातील मुस्लिम समाजाचा उबाठा पक्षात प्रवेश या आशयाची बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात ज्या मुस्लिम बांधवांची खोटी नावे टाकून जो अपप्रचार केला होता त्या मुस्लिम बांधवांनी आमदार नितेश राणे यांची निवासस्थानी येवून सदिच्छा भेट घेतली. यावेळी नईमा शेख, रेशमा शेख, निसार खोत, रिजवाना खोत, शिका खोत, नासिर खान, एह जास खान, दानिश खान, रुकसाना खान, बानुबी पणलेकर, शानवाज पनलेकर सहित शेख, हफिजा शेख आदी सह असंख्य मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा