*सावंतवाडी रुग्णालयाला भेट*
सांगेली:
सांगेली नवोदय विद्यालयात जेवणातून झालेल्या विषबाधेच्या प्रकारानंतर कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी पालकांशी ही चर्चा केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. येथे दाखल असलेल्या काही मुलांची सोमवारी दहावीची परीक्षा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्वरित पुस्तके उपलब्ध करून द्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी प्रशालेच्या प्रशासनाला केल्या.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगेली नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एम. के. जगदीश यांच्याशी संपर्क साधत झाल्या प्रकाराबाबत त्यांना खडे बोल सुनावले. प्रशालेतील मुलांच्या जेवणाबाबत एवढी हयगय आपण कसे काय करू शकता असा सवाल त्यांनी प्राचार्यांना केला. रुग्णालयात दाखल असलेल्या काही विद्यार्थ्यांची सोमवारी दहावीची परीक्षा असून त्यांना त्वरित पुस्तके उपलब्ध करून द्यायला हवी अशा सूचनाही त्यांनी प्राचार्यांना केल्या. विद्यालय प्रशासनात चाललेल्या गोंधळी कारभाराबाबत त्यांनी प्राचार्यांना चांगलेच धारेवर धरत आपला कारभार त्वरित सुधारा अशी समज दिली.
प्रशालेच्या प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा केला जात आहे. असा आरोप यावेळी पालकांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, उदय नाईक, जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू मसुरकर, केतन आजगावकर, रवी जाधव आदी उपस्थित होते.